मराठवाडा
मराठवाडा : विद्यमान महाराष्ट्र राज्यातील एक भूप्रदेश. याच्या भौगोलिक सीमा निश्चित नसून निरनिराळ्या कालखंडात त्या बदलत गेल्या, तसेच यातील प्रदेशांची नावेही बदलत गेली. १९८२ पासून औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना व लातून या सात जिल्ह्यांना मिळून मराठवाडा असे सर्वसाधारणत: संबोधले जाते. क्षेत्रफळ : ६४,२८६.७ चौ. लोकसंख्या: ९७,२६,८४० (१९८१).